खासदार नागेश पाटील आष्टीकर

गोरेगांव सवना बाभुळगांव आजेगांव सर्कलच्या वतीने फुटीर आष्टीकराचा पुतळा जाळुन निषेध    

MP Nagesh Patil Ashtikar: गोरेगाव सवना बाभुळगाव, आजेगाव सर्कल तालुक्यामध्ये मतदार आणि कार्यकर्त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा गद्दारीचे विस्मरण करून देण्याच्या हेतूने प्रतीकात्मक

गोरेगांव सवना बाभुळगांव आजेगांव सर्कलच्या वतीने फुटीर आष्टीकराचा पुतळा जाळुन निषेध    

MP Nagesh Patil Ashtikar

गोरेगाव (MP Nagesh Patil Ashtikar) : सेनगांव तालुक्यातील गोरेगाव सवना बाभुळगाव, आजेगाव सर्कल उबाठा कार्यकर्त्याच्या वतीने फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून त्यांच्या गद्दारी विरोधात जोरदार घोषना देत संताप जनक रोष व्यक्त करत गद्दारीचा निषेध केला आहे.

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांनी उबाठा पक्ष विरोधात फुटीरता केल्याने याचे तीव्र पडसाद मतदार संघात उमटत आहेत गोरेगाव, बाभुळगाव,सवना, आजेगाव सर्कलच्या मतदारांनी बंडखोरीला टाळत उबाठाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर ह्यांच्या पारड्यात मतदान केले होते परंतु निवडून आल्यानंतर खासदार आष्टीकर ह्यांनी फुटीरता स्विकारत गद्दारी केल्याने चारही सर्कल मधील कार्यकर्ते व मतदारामधे संतापाचा रोष निर्माण झाला आहे १८ जुन रोजी कार्यकर्ते मतदारांनी खासदार आष्टीकर यांचा प्रतीकात्मक पुतळा तयार करूण चौफुली चौकात त्याचे दहन केले आहे यावेळी खासदार आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष प्रगट केला गेला आहे.

यावेळी सवना गोरेगांव बाभुळगांव आजेगांव सर्कल मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बि आर नायक सवना सर्कल प्रमुख, सतिश कावरखे , वैभव पातळे शाखा प्रमुख संतोष गुडधे, कडोळी सरपच नंदू सुर्यवाड शाखा प्रमुख कडोळी , दत्ता जाधव गण प्रमुख , गजानन काळे चेअरमन चौढी ,  दत्तराव कोरडे युवा सरचिटणीस , ज्ञानेश्वर सोनुने युवा सेना सर्कल प्रमुख बाभुळगाव , नारायण वडकुते उपतालुका प्रमुख बाभुळगांव , बाळू ब्रेद्रे ,संदिप शिंदे गण प्रमुख सवना , रामेश्वर खोडे चेअरमन , गोपाल वैद्य यांचा सहभाग होता सर्वांनी गद्दार उपमा देत जाहीर निषेध केला आहे यामध्ये महाविकास आघाडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

ShivSena Parmeshwar Mandge: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, खासदार नागेश पाटील आष्टीकराला गद्दारीची आरोप करत शिवसेनेच्या विरोधात इशारा देऊन हिंगोलीत गाजावाजा सुरू

Jun 23, 2026