Gadchiroli Ashram School

गडचिरोलीतील आश्रमशाळेत मृत्यूकांड; परवाना रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीतील आश्रमशाळेत मृत्यूकांड; परवाना रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एकाचवेळी ६ विद्यार्थिनींना सर्पदंश; ३ जणींवर उपचार सुरू, आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्री आश्रमशाळेत झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना एकाचवेळी सर्पदंश झाला. त्यापैकी तिघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

या घटनेचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत आदिवासी मंत्र्यांनी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांच्यासारखे तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले नेते आश्रमशाळा चालवत असतील आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल, तर अशा प्रकाराकडे दुर्लक्ष कसे करणार, असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्रमशाळेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. संबंधित आश्रमशाळेत शिक्षक आणि वॉर्डन नसतानाही शासकीय अनुदान घेतले जात असल्याची बाब समोर आली आहे. अशा परिस्थितीत आश्रमशाळेची पाहणी करून अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यालाच निलंबित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

केवळ रस्त्यालगतच्या आश्रमशाळांची तपासणी न करता दुर्गम आणि अंतर्गत भागातील आश्रमशाळांचीही नियमित पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच मुख्य सचिवांनी बैठक घेऊन आश्रमशाळांची सर्वंकष तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी आणि त्यामध्ये सर्व संबंधित विभागांचा समावेश करावा, असे निर्देश देण्यात आले.

आदिवासी आश्रमशाळांचे विशेष ऑडिट करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. अंतर्गत भागातील आश्रमशाळांची तपासणी करून तेथील सुरक्षा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑडिटमध्ये अनियमितता किंवा गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांना कोणतीही सवलत न देता कारवाई करावी, तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश देण्यात आले. आश्रमशाळेचे संचालक किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव जाणार नाही, याची काळजी घेण्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

नेमकी घटना काय?

गडचिरोलीतील धानोरे येथील निवासी आश्रमशाळेत जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनी झोपल्या होत्या. रात्री साधारण दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर सर्व विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

धानोरा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. त्यानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला.

दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, इयत्ता सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026