वारकरी आरोग्य शिबिर

आयुर्वेद महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद उपचार शिबिर

Warkari Health Camp: महिला उत्कर्ष प्रतिष्ठान सेक्शन ८ कंपनीच्या आयुर्वेद महाविद्यालयाने वारकरांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुक्त शिबिर आयोजित केले.

आयुर्वेद महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद उपचार शिबिर

Warkari Health Camp

रिसोड (Warkari Health Camp) : महिला उत्कर्ष प्रतिष्ठान सेक्शन ८ कंपनीद्वारे संचालित आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पुंडलीक नगर, देगाव फाटा, ता. रिसोड, जि. वाशीम यांच्या वतीने शेगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षा तथा आमदार भावनाताई गवळी  यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या  आयुर्वेद वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणी केली. या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये वारकऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार मोफत आयुर्वेदिक औषधांचे वितरण करण्यात आले. पायी प्रवासामुळे उद्भवणारे सांधेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, पायांची सूज, थकवा, वातविकार तसेच इतर किरकोळ आरोग्य समस्यांवर आयुर्वेद तज्ज्ञांनी मार्गदर्शन करून उपचार केले.

या (Warkari Health Camp) शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पंचकर्म विभागातील विशेष सेवा होय. यामध्ये स्नेहन, स्वेदन, सुवर्णशलाका आदी आयुर्वेदिक उपचारांचा लाभ मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी घेतला. यावेळी आयुर्वेदिक जीवनशैली, ऋतुचर्या, योग्य आहार-विहार तसेच पायी वारीदरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतही वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

हे (Warkari Health Camp) आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी,सर्व विभागातील तज्ज्ञ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अथक परिश्रम घेतले. समाजसेवा, आरोग्यसेवा आणि आयुर्वेदाचा प्रसार या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे  सेक्शन ८ कंपनीद्वारे संचालित आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर विविध सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवत असते.

संबंधित सामग्री

श्री संत गजानन महाराज पालखीचे रिसोड शहरात आगमन; भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

श्री संत गजानन महाराज पालखीचे रिसोड शहरात आगमन; भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Sant Gajanan Maharaj Palkhi: श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे रिसोड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पालखी आगमनानिमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरण

Jun 30, 2026
रिसोड बाजार समितीत ३० जूनला संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम; सोहळा व महाप्रसादासाठी २ लाख ८१ हजार 

रिसोड बाजार समितीत ३० जूनला संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम; सोहळा व महाप्रसादासाठी २ लाख ८१ हजार 

Saint Gajanan Maharaj Palkhi: श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० जून रोजी रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन होत असून, पालखीचा मुक्काम येथे असणार आहे.

Jun 24, 2026
श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरास बंदी

श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरास बंदी

Gajanan Maharaj Temple: गजानन महाराज मंदिरश्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानने मोबाईल वापरास बंदी घालून भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे.

May 10, 2026