FDA Raid

संगमनेरमध्ये FDA ची धडक कारवाई; ‘Made in Pakistan’ सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील गोल्डन मार्केट परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पोलिसांच्या मदतीने केलेल्या अचानक कारवाईत पाकिस्तानात तयार झालेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा उघडकीस आला आहे.

संगमनेरमध्ये FDA ची धडक कारवाई; ‘Made in Pakistan’ सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

अहिल्यानगरच्या गोल्डन मार्केटमध्ये पोलीस बंदोबस्तात छापा; भारतात विक्रीस परवानगी नसलेल्या ‘गोरी’ क्रीमसह १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील गोल्डन मार्केट परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पोलिसांच्या मदतीने केलेल्या अचानक कारवाईत पाकिस्तानात तयार झालेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा उघडकीस आला आहे. या कारवाईदरम्यान ‘Made in Pakistan’ असा उल्लेख असलेली उत्पादने जप्त करण्यात आली असून याप्रकरणी दुकानदार शाहीद रियाज शेख (वय ३६) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

FDA च्या पथकाने केलेल्या तपासणीत बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक सौंदर्यप्रसाधनांवर “Made in Pakistan” असा स्पष्ट उल्लेख आढळला. जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये मानवी आरोग्यासाठी धोकादायक मानली जाणारी ‘गोरी ब्युटी क्रीम’ (Gori Beauty Cream) आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ (Gori Day and Night Cream) यांचा समावेश आहे.

या कारवाईत सुमारे १४ हजार रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित उत्पादनांना भारतात विक्रीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा साठा अहिल्यानगरपर्यंत कसा पोहोचला, याचा तपास अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस संयुक्तपणे करत आहेत.

या प्रकरणी दुकानदाराविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे संगमनेरसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून बेकायदेशीररीत्या विक्री होणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या साखळीचा शोध घेण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे.

संबंधित सामग्री

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा FDAने जप्त केला. सहा तासांच्या पाठलागानंतर ट्रक ताब्यात; चौघांवर गुन्हा दाखल.

Sep 20, 2026
नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत; विखे पाटील कुटुंबाचा जागतिक राजकारणात ठसा

नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत; विखे पाटील कुटुंबाचा जागतिक राजकारणात ठसा

नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड. स्टॉकहोम मतदारसंघातून विजय; ग्रीन पार्टीच्या नेत्या म्हणून मुलांचे कल्याण व पर्यावरणावर भर देणार.

Sep 20, 2026