हिंगोली (Electricity Theft Case) : थकीत वीज बिलापोटी पुरवठा खंडित केल्यानंतरही चोरी करणार्या औंढा नागनाथ तालुक्यातील चार गावातील एकूण २१ जनावर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी, नागझरी, येथील १२ वीज ग्राहकावर (Electricity Theft Case) अनाधिकृतपणे वीज वापर केल्याने व १३ ८७० रुपयाची वीज चोरी व ३०७३५० रुपये थकीत बिल न भरल्याने वीज ग्राहकावर व दुघाळा व जडगाव येथील ९ वीज ग्राहकावर १०३३८ वीज चोरी तसेच १५४६१० एवढ्या थकीत बीलासाठी भाऊराव लक्ष्मण ढगे, पवन सुधाकर धारकर, हैदरखॉ मिडू खॉ, गजानन गणपतराव पोले, गौतम नारायण बगाटे, हनवतराव व्दारकोजी पडोळे, सुरेश किशनराव पोले, रंजना कुंडलिक पोले, कोंडबाराव शिंदे सर्व रा. दुघाळा, उत्तम नरोजी आठवले, रशिदखान कब्बारखान पठाण, शिवाजी पांडुजी कोंडूले, सय्यद अकबर सय्यद छोटू अली, कांतिलाल भिकुलाल जयस्वाल, गणपत नारायण जुमडे, संभाजी हरी मोढे, राघू नामदेव पांढरे, कुंडलिक किशन बांगर, दिनकर माणिकराव काचगुंडे, बबन नामदेव गरपाल, अजीज रहीम बेग यांच्या विरूध्द महावितरणचे निरज रणवीर यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर वीज ग्राहकावर विज बिल थकीत प्रकरणी व वीज चोरी प्रकरणी वीजचोरी अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे वीज ग्राहकांनी अनधिकृत (Electricity Theft Case) वीज वापर मीटरची छेडछाड व महावीतरणची फसवणूक यामुळे अशा प्रकारच्या कारवाया होत आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी वीजबील भरून वितरण कंपनीला सहकार्य करावे व कुठल्याही प्रकारचे वीज पुरवठा परस्पर जोडून घेऊ नये अन्यथा कार्यवाही होऊ शकते अशी माहिती अभियंता वीज वितरण कंपनी औंढां अभीयंता नीरज रणवीर यांनी दिली आहे.
थकित वीज बिल व विज चोरी प्रकरणी औंढा तालुक्यातील २१ जनावर गुन्हे दाखल
Electricity Theft Case: हिंगोलीत, औंढा नागनाथ तालुक्यातील चार गावात वीज चोरी व थकीत बिलापोटी २१ जणांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.
Electricity Theft Case
संबंधित सामग्री
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना
पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र
सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही
नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.