Electricity Outage,

पुसेगाव ३३ केव्ही उपकेंद्रावर नागरिकांचा संताप; चार दिवसांपासून तीन फीडरचा रात्री वीजपुरवठा बंद असल्याचा आरोप

पुसेगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावर शुक्रवारी (दि. १७ जुलै) रात्री खुडज, रिधोरा, जांभरून व पारडी परिसरातील नागरिकांनी धाव घेत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

पुसेगाव ३३ केव्ही उपकेंद्रावर नागरिकांचा संताप; चार दिवसांपासून तीन फीडरचा रात्री वीजपुरवठा बंद असल्याचा आरोप

सेनगाव तालुका : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावर शुक्रवारी (दि. १७ जुलै) रात्री खुडज, रिधोरा, जांभरून व पारडी परिसरातील नागरिकांनी धाव घेत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील चार दिवसांपासून दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत या गावांना वीजपुरवठा करणारे तीन फीडर बंद ठेवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

याउलट, पुसेगाव गावठाणाचा वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवला जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नागरिकांनी उपकेंद्रावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारत वीजपुरवठ्यात भेदभाव का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. नियोजनबद्ध पद्धतीने सर्व गावांना समान वीजपुरवठा करावा आणि कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणांमुळे काही काळ वीजपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र, ही समस्या तातडीने दूर करून नियमित वीजपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे महावितरणच्या वीजपुरवठा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026