विज धक्क्याने मृत्यू 

ट्रांसफार्मर बसवताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू 

Electric Shock Death: कामगार बाबुराव जाधव यांचा वीज ट्रांसफॉर्मर बसवताना अचानक मृत्यू झाला. त्याच काळी वीज पुरवठा सुरू झाला असल्याचे दाखल नाही,

ट्रांसफार्मर बसवताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू 

Electric Shock Death


संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला वीज वितरण कार्यालयात, कारवाईची मागणी

वसमत ( Electric Shock Death) : तालुक्यातील कवठा शिवारात विद्युत ट्रांसफार्मर बसवताना वीज प्रवाह अचानक सुरू झाल्याने वीज वितरण विभागातील रोजंदारीकामगाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वीज वितरण विभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून नातेवाईकांनी मृतदेह वीज वितरण कार्यालयात आणला होता त्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे.

वसमत तालुक्यातील कवठा शिवारात बुधवारी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू होते ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी अधिकृत परमिट घेऊन काम सुरू होते त्यामुळे वीज प्रवाह बंद करण्यात आला होता  बाबुराव गंगाराम जाधव राहणार बोराळा वय 42 वर्ष हे काम करण्यासाठी विजेच्या खांबावर गेले असता अचानक विजेचा प्रवाह सुरू झाला व ते खाली कोसळले व जागीच त्यांचा मृत्यू झाला.  परमिट घेऊन वीज प्रवाह बंद करून काम सुरू झालेले असताना वीज पुरवठा कोणी व कसा  सुरू केला हे अद्याप समजलेले नाही त्यामुळे या प्रकारात वीज वितरण अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. 

घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी मयत बाबुराव जाधव यांचा मृतदेह वसमत येथील वीज वितरण कार्यालयात आणला या प्रकरणाचा तपास करावा दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. मृतदेह वीज वितरण कार्यालयात आणल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते.  वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकाशी चर्चा करून या प्रकरणात चौकशी करून दोषी असणारा विरोधात कारवाई होईल व नियमाप्रमाणे  नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन दिले पोलीस वीज वितरण विभागाचे अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांनी मयताच्या नातेवाईकाशी संवाद साधला व कार्यालयातून मत देह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. शिवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

वीज पुरवठा कसा सुरु झाला?
ट्रांसफार्मर बसवण्यासाठी परमिट घेण्यात आले होते वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे निर्धास्तपणे रोजंदारी कामगार बाबुराव जाधव खांबावर चढले होते. मात्र अचानक ते खाली कोसळले व जागीच त्यांचा मृत्यू झाला विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वीज पुरवठा बंद केलेला असताना पुरवठा कसा सुरू झाला. हे वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहित नाही त्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
वसमत तालुक्यात वीज वितरण विभागात अधिकृत कर्मचाऱ्या ऐवजी झिरो कर्मचारी जास्त काम करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यातून अपघात झाल्यानंतर नाहक त्यांचा बळी जातो आहे. या प्रकारास वीज वितरण विभागातील अनागोंदी व अधिकाऱ्यांची मनमानी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात नेमका दोष कोणाचा आहे हे तपासात निष्पन्न होणार आहे.