बुलढाणा कोरडा दुष्काळ

जिल्हा काँग्रेस कमिटीचे  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Buldhana District Dry Drought: यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका व इतर पिके करपण्याच्या स्थितीत

जिल्हा काँग्रेस कमिटीचे  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Buldhana District Dry Drought

 

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या

चिखली (Buldhana District Dry Drought) : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका व इतर पिके करपण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे (Buldhana District Dry Drought) बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश रामभाऊ अवचार (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली  ७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे संकटात सापडला असून, शासनाच्या तातडीच्या मदतीची गरज आहे. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा तात्काळ आढावा घेऊन (Buldhana District Dry Drought) कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीक नुकसानभरपाई, पीक विम्याची रक्कम आणि कर्जवसुलीस स्थगिती यांसह आवश्यक सवलती तातडीने जाहीर कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार राजेश एकडे, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते, रामविजयजी बुरुंगले, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मोहतेशाम रजा,  महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगलाताई पाटील, युवक प्रदेश सरचिटणीस विश्वदीप पडोळ,सतिश महेंद्रे, दत्ता काकस,शिवराज पाटील दिपक रिंढे,कैलास फाटे, तुळशीराम नाईक, मिलींद जयस्वाल, जाकीर कुरेशी, इरफान पठाण, डॉ पुरुषोत्तम देवकर, राम जाधव, संतोष आंबेकर, भगवान धांडे,पुरुषोत्तम झाल्टे, केशव हिंगणे, अतुल सिरसाठ, आशाताई गोंड, अनिल संबारे,अनिल भारंबे,राजु वानखेडे,सतिश टाकळकर, गजनफर खान, अजहर देशमुख,बबलु कुरेशी, विजय पाटील, ईश्वर इंगळे, मंदार गोंड ,शे अफरोज ,सुनिल कळसकर,मयुर राऊत यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सोयाबीनचे पीक ९० टक्के ठिकाणी करपले: प्रकाश अवचार पाटील

बुलढाण्या (Buldhana District Dry Drought) जिल्ह्यात ३५ दिवसांपासून पाऊस नाही आहे. सोयाबीनचे पीक ९० टक्के ठिकाणी करपले आहे. कपाशी आणि मकाची तीच स्थिती आहे. परंतु या कुंभकर्णी शासनाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही. कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरकसट मदत जाहीर करावी. तसेच शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसून १० ते १५ टक्के लोकांनाच कर्जमाफी मिळाली आहे. सरकारने कोरडा दुष्काळ व सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तातडीने द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांनी केली आहे.