दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या

दुष्काळाचा वणवा पेटला...मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला

Drought Affected farmer Suicide: तीव्र आर्थिक विवंचनेला कंटाळून एका ४४ वर्षीय शेतकरी तथा शेतमजुराने मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना औसा तालुक्यात.

दुष्काळाचा वणवा पेटला...मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला

Drought Affected farmer Suicide

 

औसा तालुक्यातील शेतकऱ्याने दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या
वानवडा गावावर शोककळा...

औसा (Drought Affected farmer Suicide) : दरवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती, शेतातील पिकांचे झालेले नुकसान आणि यामुळे निर्माण झालेल्या तीव्र आर्थिक विवंचनेला कंटाळून एका ४४ वर्षीय शेतकरी तथा शेतमजुराने मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना औसा तालुक्यातील वानवडा गावामध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय मारुती कदम (वय ४४ वर्षे, रा. वानवडा, ता. औसा) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

दत्तात्रय मारुती कदम हे शेती आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतातील पीक पूर्णपणे वाळल्यांने, हाताशी आलेले खरीप पीक करपून गेल्याचे पाहून आणि दुष्काळी परिस्थितीमुळे पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेतून ते अत्यंत नैराश्यात गेले होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
घटनेची माहिती मिळताच औसा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) बेलकुंड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या (Drought Affected farmer Suicide) घटनेचा पुढील तपास औसा ग्रामीण पोलीस करत आहेत.

मयत दत्तात्रय कदम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. (Drought Affected farmer Suicide) घरातील कुटुंब प्रमुख पुरुष गेल्याने  कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वानवडा सह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
कोट्यवधींचा दांडिया खर्च शेतकऱ्यांसाठी द्या; मराठी एकीकरण समितीची मागणी

कोट्यवधींचा दांडिया खर्च शेतकऱ्यांसाठी द्या; मराठी एकीकरण समितीची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरबा-दांडियाच्या कोट्यवधींच्या खर्चावरून वाद. मराठी एकीकरण समितीने निधी शेतकऱ्यांसाठी वापरण्याची मागणी केली.

Sep 30, 2026
दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026
अखेर मोर्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; महसूल-कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

अखेर मोर्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; महसूल-कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

Morshi Taluka Drought Affected: पावसाचा प्रदीर्घ खंड आणि अपुऱ्या पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कपाशी, तूर, मूग-उडदासह विविध पिक..

Sep 29, 2026
दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांसाठी अन्य निकषांवर मदतीचा प्रस्ताव; पाणीवापर आणि दहावी-बारावी परीक्षा शुल्काबाबतही फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश.

Sep 29, 2026