रिसोड (District-level cricket tournament) : तालुकास्तरीय आंतरशालेय १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत स्थानिक विश्वा पब्लिक स्कूलच्या संघाने अष्टपैलू व दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या प्रभावी खेळाच्या जोरावर वर्चस्व कायम राखत संघाने मानाचा चषक पटकावला असून, या उल्लेखनीय यशासह विश्वा पब्लिक स्कूलच्या संघाने आता जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी दिमाखात पात्रता मिळवली आहे.
आजच्या वेगवान आणि डिजिटल जीवनशैलीत विद्यार्थ्यांचा मोबाईलकडे वाढणारा कल लक्षात घेता, त्यांना मैदानी खेळांकडे आकर्षित करून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक वृत्ती रुजवणे गरजेचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वा पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. शाळेकडून विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शनासह नियमित सराव आणि दर्जेदार क्रीडा साहित्य व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शाळेच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश आले असून, क्रिकेट संघाने तालुका पातळीवर उत्कृष्ट खेळाची मोहोर उमटवली.
संघभावनेतून मिळवले यश: संचालक विश्वनाथ सानप
संघाच्या या घवघवीत यशाबद्दल विश्वा पब्लिक स्कूलचे संचालक विश्वनाथ सनप यांनी विजयी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांकडून कठोर मेहनत आणि नियमित सराव करवून घेणारे क्रीडा शिक्षक राज वायभासे यांच्या मार्गदर्शनाचे त्यांनी विशेष कौतुक केले. शाळेचे प्राचार्य जिबित यांनीही विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत क्रीडेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, नेतृत्वगुण, संघभावना आणि खिलाडूवृत्ती निर्माण होते, असे सांगत त्यांनी क्रिकेट संघाला आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विश्वा पब्लिक स्कूलच्या (District-level cricket tournament) या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही हा संघ दमदार कामगिरी करेल, असा विश्वास पालक व क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा
विश्वा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उत्कृष्ट व दमदार कामगिरीच्या बळावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
District-level cricket tournament: तालुकास्तरीय आंतरशालेय १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत स्थानिक विश्वा पब्लिक स्कूलच्या संघाने अष्टपैलू व दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत अजिंक्यपदावर आपले नाव
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
District-level cricket tournament