धर्मवीर फाउंडेशन

धर्मवीर फाउंडेशनचा मलकापूर तालुक्यातही प्रवेश...

Dharamveer Foundation: युवाशक्ती, समाजसेवा व राष्ट्रसेवा हा त्रिवेणीसंगम घेऊन चालणाऱ्या धर्मवीर युथ फाऊंडेशनने मलकापूर तालुक्यातील गावात निर्माण करून विविध ठिकाणी शाखांची स्थापना

धर्मवीर फाउंडेशनचा मलकापूर तालुक्यातही प्रवेश...

Dharamveer Foundation


एक नवी सामाजिक ऊर्जा प्रदान करू: पृथ्वीराज गायकवाड

बुलढाणा (Dharamveer Foundation) : युवाशक्ती, समाजसेवा व राष्ट्रसेवा हा त्रिवेणीसंगम घेऊन चालणाऱ्या धर्मवीर युथ फाऊंडेशनने मलकापूर तालुक्यातील गावात निर्माण करून विविध ठिकाणी शाखांची स्थापना सुरू केली आहे. या माध्यमातून या तालुक्यात एक नवीन सामाजिक ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प, या फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी केला आहे.

मलकापूर तालुक्यात धर्मवीर युथ फाउंडेशनच्या (Dharamveer Foundation) संघटनात्मक विस्ताराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, तालुक्यातील लोणवाडी ,जांभूळधाबा, आळंद,खामखेड,व देवधाबा या गावांमध्ये मोठ्या उत्साहात १५ जुलै रोजी नवीन शाखांची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या ध्वजांच्या साक्षीने आणि हजारो युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रत्येक शाखा उद्घाटन सोहळा प्रेरणादायी ठरला.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आज हजारो तरुण एकाच ध्येयाने एकत्र येत आहेत. समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि जनतेच्या हितासाठी कार्य करण्याची प्रेरणा या माध्यमातून युवकांमध्ये निर्माण होत असून, धर्मवीर युथ फाउंडेशन एक सशक्त सामाजिक चळवळ म्हणून पुढे येत आहे.युवकांना योग्य दिशा, सामाजिक जबाबदारी आणि लोकहिताची जाणीव करून देत फाउंडेशन प्रत्येक गावात जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज होत आहे.

यावेळी त्याठिकाणी प्रत्येक गावातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखा संघटक, सचिव, सोशल मीडिया प्रमुख व धर्मवीर युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य व असंख्य तरुण उपस्थित होते.

संबंधित सामग्री

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची हिंगोलीत महत्त्वपूर्ण बैठक 

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची हिंगोलीत महत्त्वपूर्ण बैठक 

Rohit Pawar: छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते व आमदार रोहित पवार हिंगोली दौऱ्यावर येत आहेत.

Jun 25, 2026
दलित-ब्राह्मण समीकरणातून विजय सरकारची मोठी राजकीय खेळी

दलित-ब्राह्मण समीकरणातून विजय सरकारची मोठी राजकीय खेळी

Tamil Nadu Vijay Cabinet: जवळपास 59 वर्षांनंतर, तामिळनाडूच्या राजकारणात काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय (CM Vijay) यांनी गुरुवारी दोन काँग्रेस आमदारांना मंत्री

May 22, 2026
भाजप युवा मोर्चा नांदेड महानगरची नूतन जम्बो कार्यकारणी जाहीर

भाजप युवा मोर्चा नांदेड महानगरची नूतन जम्बो कार्यकारणी जाहीर

BJP Yuva Morcha Nanded: भारतीय जनता पार्टी (भाजप)चे नांदेड महानगर युवा मोर्चा २०२६चे नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आले.

May 19, 2026
गंगापूर विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश बोडखे यांची निवड

गंगापूर विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश बोडखे यांची निवड

गंगापूर येथील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले ऋषिकेश रामानंद बोडखे यांची शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेच्या गंगापूर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

May 16, 2026
१९  जूनला मोठी घोषणा? आदित्य ठाकरेंना नवी जबाबदारी मिळण्याचे संकेत

१९ जूनला मोठी घोषणा? आदित्य ठाकरेंना नवी जबाबदारी मिळण्याचे संकेत

ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिव सेना कडून महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Apr 15, 2026