धानोरा ग्रामस्थ एल्गार

ग्रामपंचायत कारभाराच्या पारदर्शकतेसाठी धानोरा वाशियांचा एल्गार

Dhanora Villagers Protest: नोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धानोरा बु.  ग्रामपंचायतीच्या सन २०२३ पासूनच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीवरून वाद आता अधिकच तीव्र झाला आहे

ग्रामपंचायत कारभाराच्या पारदर्शकतेसाठी धानोरा वाशियांचा एल्गार

Dhanora Villagers Protest

 

विशेष ग्रामसभा व लेखापरीक्षणाच्या मागणीसाठी १५ सप्टेंबरपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणावर ठाम

मानोरा (Dhanora Villagers Protest) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धानोरा बु.  ग्रामपंचायतीच्या सन २०२३ पासूनच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीवरून वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मानोरा यांना दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन (आवक क्र. ३५४२) देऊन विशेष ग्रामसभा व स्वतंत्र लेखापरीक्षणाची मागणी केली असतानाच, आता या निवेदनाच्या प्रती थेट उच्चस्तरीय प्रशासनापर्यंत पाठवून ग्रामस्थांनी प्रशासनावर दबाव वाढविला आहे. स्थानिक आमदारांपासून तर जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे मान्यवर व अधिकाऱ्यांना देऊन न्यायाची मागणी केली आहे.
   
या प्रतिलिप्यांमुळे हे प्रकरण केवळ ग्रामपंचायत पुरते मर्यादित न राहता जिल्हा प्रशासनाच्या दरबारी गेले असून, याची गंभीर दखल घेणे प्रशासनाला भाग पडणार आहे. दि. १३/०९/२०२६ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दि. १५/०९/२०२६ पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा देणाऱ्या निवेदनावर गावातील ७ प्रमुख ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्षऱ्यांसह ठाम भूमिका मांडली आहे. यामध्ये सुरज मलिक म्हातारमारे, प्रनव विकास घाटगे, रुपेश रामराव राठोड,  दिनेश सुदाम गवई,  प्रविण विष्णू नारींगे, वृषभ धनेश्वर घाटगे आणि  सागर रामभाऊ घाटगे या सर्व निवेदनकर्त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये पारदर्शकता  यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसेवकांच्या उपस्थितीत सन २०२३ पासूनचे सर्व आर्थिक व्यवहार जनतेसमोर ठेवावेत व सक्षम प्राधिकरणामार्फत चौकशी व्हावी, अशी एकमुखी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, १३ सप्टेंबर ही डेडलाईन जवळ येत असल्याने (Dhanora Villagers Protest) धानोरा बु. ग्रामपंचायतमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण मानोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.