भाजप कार्यकर्ता मेळावा

देऊळभट्टीत भाजपचा कार्यकर्ता स्नेहमेळावा; केंद्राच्या 12 वर्षांच्या योजनांची माहिती 

BJP Workers Melava: केंद्रीय सरकारचा १२ वर्षाचा शासन निती देऊळभट्टीत स्नेहमेळाव्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. माझी आमदार देवराव होळी यांनी आदिवासी क्षेत्रातील लाभार्थींच्या पोहोचवण्याचा संकल्प

देऊळभट्टीत भाजपचा कार्यकर्ता स्नेहमेळावा; केंद्राच्या 12 वर्षांच्या योजनांची माहिती 

BJP Workers Melava

 

आदिवासी भागातील लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा संकल्प; माजी आमदार देवराव होळी यांचे मार्गदर्शन

कोरची (BJP Workers Melava) : केंद्रातील भाजप सरकारच्या 12 वर्षांच्या सुशासन आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी देऊळभट्टी येथे विशेष मार्गदर्शन व कार्यकर्ता स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

योजनांची माहिती, शेवटच्या माणसापर्यंत लाभाचा संकल्प मेळाव्यात आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार मा. देवरावजी होळी साहेब यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आदींचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवायचा, याबत (BJP Workers Melava) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात तालुक्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.  

स्नेहमेळावा व विचारमंथन या कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील समस्या माजी आमदारांसमोर मांडल्या. मा. माजी आमदार यांनी सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सर्वांनी एकत्र येऊन आगामी राजकीय व सामाजिक कामाची रणनीती ठरवली.
  
या (BJP Workers Melava) कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश सदस्य किसनजी नागदेवे, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य देवरावजी गजभिये, सदानंदजी कुथे, जिल्हा सचिव आनंदजी चौबे, कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, माजी तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भाई भामणी, माजी उपसभापती गोविंद दरवडे, नारद फुलारे, स्वप्नील कराडे, प्रशांत कराडे, माजी सरपंच राहुल मलघाम, दिलीप कोवाची, रामलाल मुलेटी, मुकेश नरोटे, अनिल जनबंधू, शालिक शोरी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शीलाताई सोनकोत्री, गीताताई कोरेटी, कुमारी सगुणा काटेंगे, संगीता कोरेटी, संगीता कोवाची, प्रेमलाल उसेंडी, डॉ. विश्वास, चिंताराम सोनूफुल, अविनाश हारामी, अर्जुन मुलेटी, पुरुषोत्तम कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी स्थानिक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास संबोधित केले. हा मेळावा स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष आनंदजी चौबे यांनी केले. सूत्रसंचालन युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी केले तर आभार मनोजजी टेम्भूर्णे यांनी मानले.