देवरत अवकाळी पाऊस

देवरीला गारपीट आणि वादळाचा तडाखा; अवकाळी पावसाचा हाहाकार, अतोनात नुकसान 

Devarat unseasonal rain: देवरी व परिसरात अवकाळी पाऊस व वादळाच्या तडाख्याने शेतकरी व नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. विजेच्या कडकडाटासह गारपिटीने भौतिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले.

देवरीला गारपीट आणि वादळाचा तडाखा; अवकाळी पावसाचा हाहाकार, अतोनात नुकसान 

Devarat unseasonal rain

देवरी/गोंदिया (Devarat unseasonal rain) : मागील दोन दिवसांपासून देवरीसह तालुक्याला अवकाळी पाऊस व वादळाचा चांगलाच तडाखा बसत आहे. तालुक्यात आज (ता.९) सायंकाळी हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने रौद्र रूप धारण केले. सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने परिसरात एकच तारांबळ उडाली. या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी जुनी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर काही भागांतील वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळ होताच वातावरण निर्मिती होत आहे. (Devarat unseasonal rain) वादळ व अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दिवसभर जाणवणार्‍या प्रचंड उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी आणि तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असतानाच या पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः आंबा आणि इतर फळबागांना या गारपिटीचा मोठा फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शहरासह ग्रामीण भागातही झाडे पडल्याने घरांचे आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेतली असून, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि झाडांखाली उभे राहू नये, असे आवाहन केले आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावेत, अशी मागणी आता बाधित शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

अर्जुनी मोरगाव व आमगावात पावसाची हजेरी

जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे (Devarat unseasonal rain) संकट कायम आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून सतत पाऊस व वादळ हजेरी लावत आहे. त्यातच आज, अर्जुनी मोरगाव व आमगाव तालुक्यातही वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून वादळाचा तडाखा बसत असल्याने नागरिकांसह शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026