Dattatray Bharne

हिंगोलीत शक्तिपीठ महामार्गाला विरोध; कृषिमंत्री दत्ता भरणेंना काजू-बदाम देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न

हिंगोलीत शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; कृषिमंत्री दत्ता भरणेंना काजू-बदाम देण्याचा प्रयत्न. प्रस्ताव रद्द किंवा पर्यायी मार्गाची मागणी.

हिंगोलीत शक्तिपीठ महामार्गाला विरोध; कृषिमंत्री दत्ता भरणेंना काजू-बदाम देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न

Dattatray Bharne

वसमत तालुक्यात आसेगाव-टाकळगावदरम्यान ताफा अडवून शेतकऱ्यांनी मांडल्या मागण्या; प्रस्तावित मार्ग रद्द करण्याची मागणी

हिंगोली : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दत्तामामा भरणे १९ सप्टेंबर रोजी हिंगोली दौऱ्यावर आले होते. वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यांतील शेतशिवारात पाहणी करून त्यांनी पिकांची स्थिती तसेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. याच दौऱ्यात शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कृती समितीच्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला.

वसमत तालुक्यातील आसेगाव ते टाकळगावदरम्यान कृषिमंत्र्यांचा ताफा थांबवून गायत्री शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे नेते तानाजी भोसले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी दत्ता भरणे यांची भेट घेतली. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि निर्णय घेण्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना प्रतीकात्मकरीत्या काजू-बदाम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न रोखला.

शक्तिपीठ महामार्गामुळे हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर बागायती आणि जिरायती जमीन बाधित होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या भीतीत आहेत. महामार्गाचा प्रस्ताव रद्द करावा किंवा त्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.

दरम्यान, कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे समजते. या प्रकारानंतर वसमत परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026