'CSC - PACS पशुसेवा केंद्र' संकल्पनेला मंजुरी; सहकार आयुक्तालयाचे सर्व जिल्हा उपनिबंधकांना निर्देश
चिखली (CSC - PACS Animal Services Centre) : केंद्र सरकारच्या ‘सहकारातून समृद्धी’ या धोरणात्मक संकल्पनेला अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्तालयाने राज्यातील ग्रामीण भागासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CSC SPV) आणि 'रमन ॲग्रो' (Raman Agro) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात 'CSC - PACS पशुसेवा केंद्र' ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात येत असून, याद्वारे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना (PACS) पशुखाद्य (Cattle Feed) वितरणाची नवी व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या (CSC - PACS Animal Services Centre) संदर्भात सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयातील उपनिबंधक (केंद्रीय योजना सहाय्य कक्ष) देवयानी भारतवाडकर यांनी पत्र जारी करून मुंबई वगळून राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना (DDR) याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय पत्राचा अधिकृत तपशील:
पत्र जावक क्रमांक: जा.क्र.कें.यो.स.कक्ष / CSC - PACS पशुसेवा केंद्र / २०२६ / ४९०
पत्र दिनांक: १७/०९/२०२६ (संदर्भ पत्र: जा.क्र. ४५९ दि. २५/०८/२०२६)
पत्र पाठवणारे कार्यालय: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
ईमेल आयडी: ncs.coopmaharashtra@gmail.com
दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२२८४६/४७ (विस्तारीत क्र. २१७ ते २१९), ०२०-२९७०४४००
ग्रामीण अर्थकारणाला मिळणार नवी दिशा
या (CSC - PACS Animal Services Centre) उपक्रमामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या (PACS) उत्पन्नात भर पडणार असून, स्थानिक पातळीवर शेतकरी व पशुपालकांना उच्च दर्जाचे पशुखाद्य रास्त दरात उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांनी आपापल्या क्षेत्रातील सक्षम PACS संस्थांच्या निदर्शनास ही योजना आणून देऊन पशुसेवा केंद्रे स्थापन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल आयुक्तालयाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नोंदणी व संपर्काचे आवाहन
या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या PACS संस्थांनी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा किंवा दिलेल्या ऑनलाइन Google Form लिंकद्वारे आपली माहिती भरावी:
CSC Agri Vertical Team प्रतिनिधी:
गणेश कान्हेरे: ७०६६६०३४४४
आसिफ पटेल: ९५९५९१६१५२
किंवा संबंधित CSC जिल्हा व्यवस्थापक (District Manager).
ऑनलाइन नोंदणी लिंक: गुगल फॉर्म लिंकवर माहिती भरा
या निर्णयामुळे ग्रामीण सहकार क्षेत्राला नवी बळकटी मिळण्यासोबतच पशुपालकांसाठी ही योजना वरदान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.