हिंगोली (Country Liquor Raid) : सेनगाव तालुक्यातील भंडारी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुवर मारलेल्या छाप्यात १७ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. परंतु पोलिसांना दुरुनच पाहून दारु विक्रेत्याने पलायन केल्याची वेगळीच चर्चा रंगत आहे.
सध्या सण व उत्सव सुरु झाले आहेत. त्यानिमित्ताने अनेकजण अवैध दारुची साठवणुक करीत असल्याने पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या सुचनेवरून जिल्ह्यात अवैध दारुवर छापे मारले जात आहेत. ११ सप्टेंबरला भंडारी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी ८.४० च्या सुमारास (Country Liquor Raid) छापा मारला. यामध्ये घटनास्थळी १७०० रुपयाच्या १७ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे पोलिसांना दुरुनच पाहून दारु विक्रेत्याने घटनास्थळावरून पलायन केले. या झालेल्या पलायन बद्दल मात्र ग्रामस्थात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
देशी दारु छापा
...अन् पोलिसांना पाहून दारु विक्रेत्याने ठोकली धुम; सेनगाव तालुक्यातील भंडारी येथील घटना
Country Liquor Raid: सेनगाव तालुक्यातील भंडारी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुवर मारलेल्या छाप्यात १७ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. परंतु पोलिसांना दुरुनच पाहून दारु
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Country Liquor Raid
टैग्स:
Country Liquor Raid