रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन

प्रभू राम मंदिर दानपेटी अपहाराविरोधात काँग्रेस आक्रमक; १६ जुलैला रिसोड येथे 'रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन

Ram Satyagraha Andolan: १६ जुलै रिसोड येथे काँग्रेसने 'रघुपति राघव राजाराम सत्याग्रह' आयोजित केले. प्रभू राम मंदिरातील दानपेटी अपहरणाचा विरोध करून जनता व भक्तांना आवाहन केले.

प्रभू राम मंदिर दानपेटी अपहाराविरोधात काँग्रेस आक्रमक; १६ जुलैला रिसोड येथे 'रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन

Ram Satyagraha Andolan

​रिसोड (Ram Satyagraha Andolan) :अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र मंदिरातील देणगी आणि दानपेटीतील कोट्यावधी रुपयांचा अपहार करून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात केला आहे. प्रभू रामाच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्या व देवाच्या दरबारात दरोडा टाकणाऱ्या या दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात 'रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन' सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत गुरुवार, १६ जुलै रोजी रिसोड येथे भव्य सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

​रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. प्रभू रामाच्या नावावर होणाऱ्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

​नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
या आंदोलनात रिसोड तालुक्यातील नागरिक, रामभक्त आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन रिसोड तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामेश्वर देवकर यांनी केले आहे.