चिखली शिवसेना आक्रमक

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक

Chikhli ShivSena Protest: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, ११ सप्टेंबर २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व गंभीर प्रश्नांसंदर्भात मा. तहसीलदार चिखली व मा. उपअभियंता महावितरण

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक

Chikhli ShivSena Protest

 

चिखली तहसीलदार व महावितरण उपअभियंत्यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन सादर
८ दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चिखली (Chikhli ShivSena Protest) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, ११ सप्टेंबर २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व गंभीर प्रश्नांसंदर्भात मा. तहसीलदार चिखली व मा. उपअभियंता महावितरण कार्यालय चिखली यांना निवेदन देण्यात आले. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुख प्रा. नरुभाऊ खेडेकर तसेच जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

​गेल्या ४० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मुख्य मागणी निवेदनावारे करण्यात आली आहे.

​निवेदनातील प्रमुख मागण्या:

शेतकऱ्यांना दिवसा १० तास सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरण कार्यालयाने नियोजन करावे.
​शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय विनाअटी कर्जमुक्ती मिळावी.
​मागील वर्षाचा प्रलंबित पीकविमा तात्काळ मंजूर करून वितरित करावा.
​गेल्या ४० दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने पिकांचे पंचनामे करावेत.
​येत्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत.
​येणाऱ्या ८ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास 'शिवसेना स्टाईल'ने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी प्रशासनाला देण्यात आला.

​यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिक:

या (Chikhli ShivSena Protest) प्रसंगी उपजिल्हा प्रमुख शिवसेना विलासभाऊ सुरडकर, तालुका प्रमुख शिवसेना तथा उपसभापती कृ.उ.बा.स. चिखली श्रीकिसन धोंडगे पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, शहर प्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शिवसेना तालुका संघटक विष्णू मुरकुटे, किसानसेना जिल्हाप्रमुख वसंतराव झाल्टे, विधानसभा संघटक अरुणभाऊ खडके, बाजार समिती संचालक मनोज भुतेकर, शहर संघटक प्रितमभैय्या गैची, युवासेना उपजिल्हा प्रमुख अशोक सुरडकर, युवासेना शहर प्रमुख आनंद गैची, युवासेना तालुका प्रमुख गजानन पवार, खरेदी विक्री मा. उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, उप तालुका प्रमुख कौतिकराव जाधव, किसानसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आंबसकर, सुनिल रगड, बंडुभाऊ जाधव, आण्णाभाऊ देवकर, बंडु सुरुशे, मनोहर शिंदे, गजानन वायाळ, रामराव आंभोरे, मधुकर वायाळ, विलास ठेंग, विजयसिंग सोळंंकी, बद्रीनाथ गाढवे, विजय जाधव, देविदास लोखंडे, टि.सी.काळे, आत्मारामभाऊ भुतेकर, विजय लोखंडे, सोपान भालेकर, जगन्नाथ घुबे, भास्करराव गायकवाड, गजानन तायडे, समाधान जाधव, मालोजीराव गुजर, अशोकराव भोसले, मनोज खेडेकर, प्रविण सरदार, गजानन जाधव, नितीन घेवंदे, गजानन गायकवाड, भगवान म्हस्के, अरुण सुरडकर, अंकुश घाडगे इत्यादी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.