चिखली अपघाती मृत्यू

चिखलीत मोठी दुर्घटना: फ्लॅट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा निर्माणाधीन इमारतीवरून पडून मृत्यू

Chikhli Accidental Death: चिखली शहरातील शाहूनगर परिसरात बीडीसीसी बँकेच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका बहुमजली निर्माणाधीन अपार्टमेंटमधून खाली पडल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

चिखलीत मोठी दुर्घटना: फ्लॅट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा निर्माणाधीन इमारतीवरून पडून मृत्यू

Chikhli Accidental Death

चिखली (Chikhli Accidental Death) : चिखली शहरातील शाहूनगर परिसरात बीडीसीसी बँकेच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका बहुमजली निर्माणाधीन अपार्टमेंटमधून खाली पडल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्षा गुलाबराव चेके (वय ४५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
​
नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास वर्षा गुलाबराव चेके या मनोरमा श्रीकृष्ण कुसळकर यांच्यासह बीडीसीसी बँकेच्या पाठीमागे लेआउटमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. फ्लॅट पाहणी सुरू असतानाच त्या अचानक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या.
​घटना घडताच तेथे उपस्थित असलेले मजूर आणि नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांना (Chikhli Accidental Death) मृत घोषित केले. मृत वर्षा चेके यांचे पती लव्हाळा येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
​
पोलीस ठाण्यात मर्ग दाखल
​या (Chikhli Accidental Death) प्रकरणी मृतकेचे नातेवाईक भास्कर लक्ष्मण चेके (वय ६९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. सुरा, ता. देऊळगाव राजा) यांच्या तोंडी रिपोर्टवरून चिखली पोलीस ठाण्यात मर्ग क्र. ४२/२६, कलम १९४ बीएनएसएस (BNSS) अंतर्गत २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १४:०८ वाजता गुन्हा/नोंद दाखल करण्यात आली आहे.

​पोलीस तपास सुरू
​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. ही (Chikhli Accidental Death) घटना नेमकी कशी घडली, त्या पाचव्या मजल्यावरून खाली कशा पडल्या आणि त्यामागील कारण काय, याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गजानन जनार्धन काकडे  पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026