२१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
चिखली (Chikhali Sahakar Ganesh Mandal) : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक बांधिलकी, पर्यावरणसंवर्धन आणि आरोग्य जनजागृतीची जोड मिळावी, या उद्देशाने चिखली येथील सहकार्य गणेश मंडळाने यंदा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. भक्तीसोबत पर्यावरणाचे रक्षण, गरजूंसाठी रक्तदान आणि महिलांना आनंददायी व्यासपीठ उपलब्ध करून देत मंडळाने गणेशोत्सवाचा सामाजिक संदेश अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला.
डी. पी. रोडवर १०१ वृक्षांचे वाटप
पर्यावरणाचा वाढता ऱ्हास, वेगाने होणारी वृक्षतोड, वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीचे परिणाम लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी डी. पी. रोडवरील व्यापारी बांधवांना १०१ वृक्ष व रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये तुळस, आंबा, रामफळ, टिकोमा यांसह विविध औषधी व फळझाडांच्या रोपांचा समावेश होता. या उपक्रमासाठी पत्रकार पत्रकार उद्धव थुट्टे, सिद्धिविनायक ज्वेलर्सचे संचालक वर्धमान डहाळे तसेच खामगाव-जालना रेल्वे लोक आंदोलन समितीचे प्रा. किशोर वळसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते व्यापारी बांधवांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.
२१ रक्तदात्यांनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश
पर्यावरणसंवर्धनासोबतच आरोग्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून २१ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. रक्तदान करणाऱ्यांमध्ये जितेश ढोमणे, कुणाल नागवानी, कृष्णा रक्ताडे, प्रशांत लोखंडे, ऋषिकेश डहाके, निलेश सावळे, आशिष गोलानी, विनोद शेळके, ऋषिकेश कोल्हे, अविनाश घेवंदे, मंगेश मुंढे, श्रीकांत सोळंकी, शुभम फुलझाडे, निलेश भुसारी, सुचित भराड, संदीप लोखंडे, राकेश चोपडा, प्रदीप भुसारी, आहाड खान, शरयू सोळंकी आणि अनुप यादव यांचा समावेश होता.
रक्तदान शिबिराला लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याची ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांसाठी मनोरंजनाचे व्यासपीठ
गणेशोत्सवातील सामाजिक सहभाग अधिक व्यापक करत २१ सप्टेंबर रोजी रात्री महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांचे जीवन केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरते मर्यादित न राहता त्यांना आनंद, सहभाग, मनोरंजन आणि आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात यांसारख्या छोट्या, मनोरंजक आणि आनंददायी स्पर्धांचा समावेश होता. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या (Chikhali Sahakar Ganesh Mandal) सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य गणेश मंडळाचे अध्यक्ष संदीप लोखंडे यांच्यासह जयंत चव्हाण, श्रीकांत सोळंकी, निलेश भुसारी, सुचित भराड, नितीन वराडे, वचन वायकोस, नितीन जांगीड, आशिष गोलानी, संजय कदम, चेतन नागवानी, दत्ता खंडेलवाल, प्रसाद सोळंकी, ओम वसु, हर्षल अग्रवाल, निखिल खरपास, कुणाल नागवानी, अभिषेक काकडे, पवन देशमुख, कृष्णा नागरे, कुणाल म्हस्के, कुणाल चव्हाण, सुमित सुरडकर, जय म्हस्के, कमलेश चौधरी, कुलदीप राजपुरोहित, अमित सुरडकर, सोहम मोरे, सोहम बोबडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच अमोल इंगळे, प्रणव कोठारी, गोपाल पाटील आणि सागर भोलाने यांनी विशेष सहकार्य केले.