चिखली रनर्स ग्रुप

शौर्य रन सीझन-२ मध्ये चिखली रनर्स ग्रुपचा डंका; ११ धावपटूंची उल्लेखनीय कामगिरी!

Chikhali Runners Group: अहिल्यानगर सायकलिंग क्लब आणि इंडियन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य रन सीझन-२’ या राष्ट्रीय स्तर

शौर्य रन सीझन-२ मध्ये चिखली रनर्स ग्रुपचा डंका; ११ धावपटूंची उल्लेखनीय कामगिरी!

Chikhali Runners Group

 

​८ धावपटूंनी २१ किमी हाफ मॅरेथॉन, तर ३ धावपटूंनी १० किमी शर्यत केली पूर्ण

चिखली (Chikhali Runners Group) : अहिल्यानगर सायकलिंग क्लब आणि इंडियन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य रन सीझन-२’ या राष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत चिखली रनर्स ग्रुपच्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या क्रीडाकौशल्याची आणि जिद्दीची मोहर उमटवली. या स्पर्धेत ग्रुपच्या तब्बल ११ धावपटूंनी विविध गटांत शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करत चिखलीचे नाव राज्यभरात उज्ज्वल केले आहे.

​सदर स्पर्धेत अतिशय आव्हानात्मक मानली जाणारी २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन अनिल काळे मामा, अनिल गाडे, नंदकिशोर पिसे पाटील, गणेश धांडे, नाना सपकाळ, विष्णू सोळंकी, कैलास ठेंग आणि संतोष रिंढे या ८ धावपटूंनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या आणि वेळेत पूर्ण केली.

​तसेच १० किलोमीटरच्या शर्यतीत बबन लांडगे सर, दीपक कदम आणि शिवम दळवी या ३ धावपटूंनी बाजी मारत आपली तंदुरुस्ती, सातत्य आणि धावण्याची जिद्द सिद्ध केली. ​धावणे ही केवळ एक स्पर्धा नसून ती निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक विचारसरणीचे प्रतीक आहे, हा संदेश चिखली रनर्स ग्रुप गेली अनेक वर्षे समाजाला देत आहे. ‘धावूया निरोगी आयुष्यासाठी, जिंकूया स्वतःशीच!’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून धावणाऱ्या या ग्रुपचे खेळाडू सातत्याने विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असतात.

​छत्रपती संभाजीनगर येथील ‘शौर्य रन’मधील या दैदिप्यमान कामगिरीबद्दल चिखली रनर्स ग्रुपच्या सर्व धावपटूंचे क्रीडाप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

टैग्स: Chikhali Runners Group