चिखली SIR मोहिम

चिखलीत SIR मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; मतदार पडताळणीचे 93.76 टक्के फॉर्म वाटप पूर्ण

Chikhali SIR Campaign: चिखली तहसील कार्यालयाला भेट देऊन 23 चिखली विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) कार्यक्रमाचा आढावा घेतला.

चिखलीत SIR मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; मतदार पडताळणीचे 93.76 टक्के फॉर्म वाटप पूर्ण

Chikhali SIR Campaign

चिखली (Chikhali SIR Campaign) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांनी सोमवारी (दि. 13 जुलै) सकाळी 11.30 वाजता चिखली तहसील कार्यालयाला भेट देऊन 23 चिखली विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी मतदार पडताळणीसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची सविस्तर समीक्षा करण्यात आली.

दि. 12 जुलै 2026 अखेरच्या अहवालानुसार, 23 चिखली विधानसभा मतदारसंघातील एकूण 3 लाख 1 हजार 720 मतदारांपैकी 2 लाख 82 हजार 885 गणनापत्रांचे (EF Form) वाटप पूर्ण झाले असून, ही प्रगती 93.76 टक्के इतकी आहे. तसेच 71 हजार 76 गणनापत्रांचे ऑनलाइन डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण 23.56 टक्के आहे. आढावा बैठकीत ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडील कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.

दरम्यान, (Chikhali SIR Campaign) मतदार यादीच्या भाग क्रमांक 277 (पळसखेड दौलत) येथे विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्या हस्ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी योगेश काशिनाथ पाटील (BLO), पर्यवेक्षक संजय चौधरी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी राजेश वाघ यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने तहसीलदार विजय सवडे नायब तहसीलदार गोपाल कडू व इतर अधिकारी उपस्थित होते. या गौरवामुळे उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधित सामग्री

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघा साठी १८ जून रोजी मतदान

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघा साठी १८ जून रोजी मतदान

Legislative Council Voting: केंद्र आणि नगर पंचायत सदस्यांसाठी स्थानीय परिषद मतदान, सात केंद्रांत मतदारांना ४६६ मतदानाचा हक मिळेल. मतपात्रता शर्तीसह मतदान वेळ ८:०० ते १६:००.

Jun 15, 2026