रिसोड (Vishnupant Bhutekar) : भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर (Vishnupant Bhutekar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले जाणारे सर्व जाहीर व सामाजिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी बांधव कोरड्या दुष्काळाच्या तीव्र संकटात सापडले असल्याने, त्यांच्या दुःखात सहभागी होत हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे.
विष्णुपंत भुतेकर (Vishnupant Bhutekar) यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे व सत्कार सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला असून शेतात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत कोणताही उत्सव किंवा सोहळा साजरा न करण्याचा निर्णय भुतेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम, आरोग्य शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. वाढदिवसाच्या दिवशी केवळ शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी भुतेकर दिवसभर कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे उपस्थित राहणार आहेत.
सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, संस्था व मित्रमंडळांनी या निर्णयाची नोंद घ्यावी; वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, स्वागत सोहळे किंवा डिजिटल फलक उभारू नयेत, असे आवाहन भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महावीरसिंह ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सभापती विष्णुपंत भुतेकर
शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असल्याने विष्णुपंत भुतेकर यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द
Vishnupant Bhutekar: भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर (Vishnupant Bhutekar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले जाणारे सर्व जाहीर
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Vishnupant Bhutekar
टैग्स:
Vishnupant Bhutekar
संबंधित सामग्री
दुष्काळाच्या सावटामुळे विष्णुपंत भुतेकर यांचा वाढदिवसाचे जाहीर कार्यक्रम रद्द!
Vishnupant Bhutekar: भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. विष्णुपंत भुतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व जाहीर कार्यक्रम यंदा रद्द
Oct 02, 2026