महिला विनयभंग प्रकरण

महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास

Woman Modesty Case: हिलेचा विनयभंग करून धमकी दिल्याप्रकरणी आरोपी आकाश भीमराव वाघमारे (रा. रहीत) यास मंगरूळपीर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. तारे यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले.

महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास

Woman Modesty Case

 

मंगरूळपीर न्यायालयाचा निकाल; चार हजारांचा दंड, रक्कम पीडितेला देण्याचे आदेश

मंगरूळपीर (Woman Modesty Case) : महिलेचा विनयभंग करून धमकी दिल्याप्रकरणी आरोपी आकाश भीमराव वाघमारे (रा. रहीत) यास मंगरूळपीर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. तारे यांच्या न्यायालयाने आज, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दोषी ठरविले. आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच चार हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

प्राप्त माहितीनुसार, ३० डिसेंबर २०१९ रोजी पीडिता माहेरहून पती व मुलाबाळांसह सासरी जाण्यासाठी निघाली होती. मंगरूळपीर येथील मानोरा चौकात वाहनाची प्रतीक्षा करीत असताना आरोपी आकाश वाघमारे तेथे आला. यावेळी त्याने सार्वजनिक ठिकाणी पीडितेचा विनयभंग केला तसेच धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी ए.एस.आय. मोहरसिंग जाधव यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब, कागदोपत्री पुरावे तसेच दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले. न्यायालयाने भादंवि कलम ३५४ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, तर कलम ५०६ अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असून दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विजय डी. आरु यांनी सहायक संचालक पी. पी. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले. प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर, ठाणेदार किशोर शेळके, पैरवी अधिकारी ए.एस.आय. ज्योती डोंगरदिवे तसेच पोलीस शिपाई विशाल फुफुटे व सरुबाई हिंगमिरे यांचे सहकार्य लाभले.

टैग्स: Woman Modesty Case