भंगेवाडी धरणे आंदोलन

विहीर पाण्याने भरलेली अन् गावात मात्र निर्जळी!

Bhangewadi Dharne Andolan:गेल्या तीन वर्षांपासून जलजीवन मिशन अंमलात असलेल्या भंगेवाडी गावात, व्हिस्किंग यंत्राचा अभावामुळे पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

विहीर पाण्याने भरलेली अन् गावात मात्र निर्जळी!

Bhangewadi Dharne Andolan

 

भंगेवाडी ग्रामस्थांचा धरणे आंदोलनाचा इशारा

लातूर (Bhangewadi Dharne Andolan) : औसा तालुक्यातील भंगेवाडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे कामे करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून विहीर पाण्याने भरून असतानाही   ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या विरोधात ग्रामस्थांनी दि. 24 जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे.

 भंगेवाडी ग्रामपंचायतीने (Bhangewadi Dharne Andolan) गेल्या तीन वर्षांपासून जल जीवन मिशन अंतर्गत विहीर पाण्याची टाकी व घरोघरी नळ योजना राबविलेली आहे. मात्र कंत्राटदारांने विहिरीला विद्युत पुरवठा न केल्यामुळे विहीर तुडुंब भरलेली असतानाही, गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच गेल्या वर्षी नळाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सापाचे तुकडे व इतर जीव जंतू आढळून आल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत इकडे आरो फिल्टर संच उभा करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु ग्रामपंचायतीने त्याबाबत गंभीर दखल न घेता फक्त चालढकल करण्याचे काम केले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतीने गेल्या एक वर्षात आरो फिल्टर संच उभारण्यासाठी फक्त एक लोखंडी सांगाडा उभा करून ठेवलेला आहे. त्यामुळे  ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ जलजीवन योजनेअंतर्गत झालेल्या विहिरीतून पाणी उपसा करून गावात दररोज शुद्ध पाणीपुरवठा करावा, खेळाडूंना खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे, बंद असलेले पथदिवे चालू करावे, या मागण्यांसाठी दि. 24 जून पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे.

संबंधित सामग्री

पंधरा दिवसांपासून पाऊस गायब; पानकनेरगा गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

पंधरा दिवसांपासून पाऊस गायब; पानकनेरगा गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगा परिसरात गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य योजनेअंतर्गत असलेल्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.

Jul 16, 2026
हिंगोलीत पाणी टंचाईचा उद्रेक; पालकमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, महिलांनी फोडली मडकी

हिंगोलीत पाणी टंचाईचा उद्रेक; पालकमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, महिलांनी फोडली मडकी

हिंगोली शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप उफाळून आला.

May 01, 2026