मानोरा (Banjara Samaj ST Reservation) : राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांची नुकतेच मुंबई मंत्रालयात काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी भेट घेऊन बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व जिंतूर येथे सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या एसटी उपोषण आंदोलन संदर्भात चर्चा करून न्याय देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.
जिंतूर येथे विनोद आडे व इतर हे मागील १३ दिवसांपासून महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याखाली तसेच बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील ९ युवक १३ सप्टेंबर पासून सामुहिक उपोषण करीत आहेत. सदर (Banjara Samaj ST Reservation) बंजारा समाजाची एसटी मागणी व जिंतूर येथे काही समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची बाब राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन आ. राजेश राठोड यांनी आणून दिली.
जिंतूर येथे पोलीस प्रशासनाकडून समाज बांधवावर दाखल झालेल्या गुन्हेबाबत ना. नाईक यांनी तात्काळ परभणी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. तसेच (Banjara Samaj ST Reservation) एसटी आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब अवगत करु असे आश्वासन दिले.