बाभुळगाव शेतकरी आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे बाभुळगावच्या शेतकऱ्याची आत्महत्या

Babhulgaon Farmer Suicide: वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असल्याने तसेच नापिकीमुळे शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

नापिकी व कर्जामुळे बाभुळगावच्या शेतकऱ्याची आत्महत्या

Babhulgaon Farmer Suicide

हिंगोली (Babhulgaon Farmer Suicide) : वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असल्याने तसेच नापिकीमुळे शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत वसमत ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गंगाधर शंकरराव ढोरे (४५) यांना शेती असून त्यांनी शेतीकरिता मध्यंतरी बँकेचे कर्ज घेतले होते. तसेच नापिकी असल्याने कुटुंबीयाची उपजीविका कशी भागवावी अशा चिंतेमध्ये ते होते. २६ सप्टेंबर शनिवार रोजी नेहमी प्रमाणे ते शेतामध्ये होते. सकाळच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात या (Babhulgaon Farmer Suicide) घटनेबाबत आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. वसमत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.