औसा अंधश्रद्धा निर्मूलन

अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी शपथ

Ausa Superstition Eradication:आझाद महाविद्यालयात 'अंधश्रद्धा निर्मूलन' आणि 'जादूटोणा-विरोधी कायद्यांबद्दल जागरुकता' सृजनासाठी शपथ कार्यक्रम आयोजित. शिक्षक, विद्यार्थी व संस्थेच्या प्रतिनिधींनी सहभागी.

अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी शपथ

Ausa Superstition Eradication

 

एकता बहुउद्देशीय महिला मंडळाचा आझाद महाविद्यालयात उपक्रम

लातूर (Ausa Superstition Eradication) : राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, लातूरचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि कासारशिरसी येथील एकता बहुउद्देशीय महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने औसा येथील आझाद महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी शपथ देण्यात आली.

आझाद महाविद्यालयाचे उपप्राचार्य अचोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रकाश घादगिने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक दत्ता सुरवसे आणि समन्वयक फेरोज शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी शपथ देण्यात आली.

अंधश्रध्दा निर्मूलन (Ausa Superstition Eradication) व जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत सविस्तर माहिती देण्यात आली देण्यात आली. अंधश्रध्देचे दुष्परिणाम, जादुटोणा प्रतिबंधक कायद्याचे महत्व, वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन व जादुचे वेगवेगळे प्रयोग करून दाखवून प्रकाश घादगिने यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांना मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. तोटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रतिनिधी व व महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी सहकार्य केले.