रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या चौकशीसाठी रिसोड येथे 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलन!

Raghupati Raghava Rajaram Satyagraha: आमदार अमितभाऊ झनक नेतृत्वाखालील 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलने रिसोड येथे प्रभू शिराम मंदिरातील देणगी आणि गैरव्यवहारी कथित निष्पत्तीच्या मागणी

अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या चौकशीसाठी रिसोड येथे 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलन!

Raghupati Raghava Rajaram Satyagraha

 

आमदार अमितभाऊ झनक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि नागरिकांचा जनआक्रोश;
प्रभू श्रीरामांच्या नावाचा राजकीय गैरवापर थांबवण्याची मागणी

​रिसोड (Raghupati Raghava Rajaram Satyagraha) : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच प्रभू श्रीरामांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज राम मंदिर, रिसोड येथे ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन अत्यंत उत्साहात आणि शांततेच्या मार्गाने पार पडले.

​या आंदोलनाला रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अमितभाऊ झनक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी अत्यंत मोठ्या संख्येने एकत्र येत लोकशाही मार्गाने आपल्या तीव्र भावना प्रशासनासमोर व्यक्त केल्या. ​"प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाच्या आणि कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या पावन नावाचा वापर करून केला जाणारा कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार कदापि खपवून घेतला जाणार नाही." अशी ठाम भूमिका यावेळी आमदार अमितभाऊ झनक व आंदोलकांनी मांडली.

संबंधित सामग्री

राम मंदिर देणगी भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ; लातुरात 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह

राम मंदिर देणगी भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ; लातुरात 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह

Ram temple Corruption: अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासाठी देशभरातील भाविकांकडून गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ

Jul 07, 2026