अर्जुन खिराडे उपोषण

प्रशासकीय हुकूमशाही विरोधात अर्जुन खिराडे यांचे आजपासून आमरण उपोषणाला प्रारंभ

Arjun Khirade's hunger strike: भ्रष्ट आणि दिशाभूल करणाऱ्या प्रशासकीय कारभाराविरोधात तसेच हक्काच्या न्यायासाठी मौजे गुंडी येथील अर्जुन मारोती खिराडे

प्रशासकीय हुकूमशाही विरोधात अर्जुन खिराडे यांचे आजपासून आमरण उपोषणाला प्रारंभ

Arjun Khirade's hunger strike

 

ग्रामसेवकाच्या निलंबनासह अतिक्रमण निष्कासनाची मागणी!

मानोरा (Arjun Khirade's hunger strike) : भ्रष्ट आणि दिशाभूल करणाऱ्या प्रशासकीय कारभाराविरोधात तसेच हक्काच्या न्यायासाठी मौजे गुंडी येथील अर्जुन मारोती खिराडे, यांनी सोमवार दि. २० जुलै २०२६ पासून  पंचायत समिती कार्यालयात आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. 

खिराडे (Arjun Khirade's hunger strike) यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार मौजे गुंडी येथील मालमत्ता क्र. १०४ वरील अतिक्रमण प्रकरणात संबंधित ग्रामसेवकाने वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल करून खोटा व चुकीचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल करून, खोटा व चुकीचा अहवाल सादर करून अतिक्रमण करणाऱ्याला पाठिशी घालणारे संबंधित ग्रामसेवक जी. डी. जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व त्यांची विभागीय चौकशी सुरू करावी.

विस्तार अधिकारी (कृषी) यांच्या चौकशी अहवालानुसार मालमत्ता क्र. १०४ वर सिद्ध झालेले अतिक्रमण तात्काळ बरखास्त (निष्कासित) करण्यात यावे.  अशी भूमिका घेत खिराडे यांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.  प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही होत आहे. भर उन्हात उघड्यावर बसलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र पवार, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद राठोड यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला असुन वृत्त लिहिस्तोवर दुपारपर्यंत आंदोलन सुरूच होते.

संबंधित सामग्री

क्रीडांगण व शाळेची आरक्षित जागा 'कृषी झोन' मध्ये करण्यास रिपब्लिकन भीमशक्तीचा विरोध

क्रीडांगण व शाळेची आरक्षित जागा 'कृषी झोन' मध्ये करण्यास रिपब्लिकन भीमशक्तीचा विरोध

Kanhan-Pipri Municipal Council: नगरपरिषद कन्हान-पिपरी विकास आरा खड्यातील कन्हान-सिहोरा येथील क्रीडांगण व प्राथ मिक शाळेसाठी आरक्षित जागा 'कृषी ' मध्ये समाविष्ट करण्याच्या हालचालींना रिपब्लिकन भीमशक्ती

Jul 02, 2026