आंबेडकरी संमर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार

आंबेडकरी चळवळीतील योगदानाची दखल; मार्शल चंद्राभाऊ ठाकरे यांना ‘आंबेडकरी संमर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार’

Ambedkarite Dedicated Activist 'Gaurav' Award: आंबेडकरी विचारांची ज्योत समाजमनात तेवत ठेवत सामाजिक समता, धम्मप्रचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी आंबेडकरी आंदोलक व धम्मप्रचारक मार्शल चंद्राभाऊ ठाकरे

आंबेडकरी चळवळीतील योगदानाची दखल; मार्शल चंद्राभाऊ ठाकरे यांना ‘आंबेडकरी संमर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार’

Ambedkarite Dedicated Activist 'Gaurav' Award

नागपूर (Ambedkarite Dedicated Activist 'Gaurav' Award) : आंबेडकरी विचारांची ज्योत समाजमनात तेवत ठेवत सामाजिक समता, धम्मप्रचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेले आंबेडकरी आंदोलक व धम्मप्रचारक मार्शल चंद्राभाऊ ठाकरे यांना यंदाचा ‘आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, वैचारिक व धम्मविषयक कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात येत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही पुरस्कार परंपरा आंबेडकरी चळवळीतील योगदानाची पावती मानली जात आहे.
         
नागपूर जिल्ह्यातील गोंडखेरी हे  चंद्राभाऊ ठाकरे यांचे मुळ गाव! त्यांनी आपल्या वडिलांच्या आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक परिवर्तनाचा वसा स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत धम्मप्रचार केला. मातंग, चर्मकार, ओबीसी, बंजारा यांसह विविध समाजघटकांना बौद्ध धम्माच्या विचारांशी जोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी धम्मदीक्षा व सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच वाचनाची आवड निर्माण व्हावी, बुद्ध आणि धम्माच्या विचारांची पेरणी व्हावी यासाठीही त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

समता सैनिक दलाच्या माध्यमातून सामाजिक व धम्मकार्याला त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे.हेच काय तर चंद्रा भाऊ हे धम्म आणि आंबेडकारी विचारच समाजत पेरत नसून ते समाजातील गरजू, अपंग, दृष्टीहीन लोकांना अवयव मिळावे म्हणून अवयवदान व अंगदान करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रयत्न करतात. त्यांना आपल्या समतेचा विचारातून देशाला लोकराष्ट्र बनविण्यासाठी सुद्धा ते पीपल्स पँथर मध्ये कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे, ‘आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार’ या पुरस्कार मालिकेत यापूर्वी विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. २०२१ मध्ये मार्शल सुधाकर सोमकुंवर, २०२२ मध्ये डॉ. बुद्ध शरण हंस, २०२३ मध्ये अॅड. मार्शल अभयकुमार वर्मा, २०२४ मध्ये छायाताई खोडबागे आणि २०२५ मध्ये डॉ. शिलाताई दांडगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यंदा २०२६ साठी मार्शल चंद्राभाऊ ठाकरे यांच्या कार्याची निवड करण्यात आली आहे. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या चंद्राभाऊ ठाकरे यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जिद्दीला मिळालेली दाद होय.