जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस. एन. माने - गाडेकर यांनी सुनावला निकाल
हिंगोली (Hingoli beating case) : तालुक्यातील नर्सी नामदेव ते कडती जाणार्या रस्त्यावर कयाधू नदीच्या पुला समोर रस्त्यावर एकास मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका आरोपीला ३ आरोपी पैकी दोषी ठरविलेल्या मुख्य एका आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस.एस. माने, गाडेकर यांनी सुनावली.
याबाबत सरकारी अभियोक्ता एस.एस. मुटकुळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिलेली माहिती अशी की, नर्सी नामदेव ते कडती रस्त्यावर कयाधू नदीच्या पुला समोरील रस्त्यावर भुजंग पडघान हा अॅटो क्रमांक एमएच ३८ - ३७२० हा साक्षिदारासह चालवत असताना ७ मार्च २०१६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपी सम्राट अशोक श्रीरंग जावळे, राजू आनंदा खंदारे, निशांत रामराव राऊत यांनी संगणमत करून भुजंग पडघान यांच्या मोटार सायकलचा पाठलाग करून अनैतिक संबंधाच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या तिन्ही आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या (Hingoli beating case) गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. चकोर यांनी करून हिंगोली जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. ११ मे रोजी जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस. एन. माने - गाडेकर यांनी एकुण ३ आरोपी पैकी सम्राट अशोक श्रीरंग जावळे रा वरूड गवळी याला दोषी ठरवून सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्या तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच कलम ३०७ भादवीमध्ये तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. एस. एन. मुटकुळे यांनी साक्षिदार तपासले व अंतिम युक्तीवाद केला. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे, श्रीमती सविता एस. देशमुख (जाधव) यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी सहाय्यक उपनिरीक्षक श्रीमती जे.एन. खिल्लारे यांनी सहकार्य केले.