अमेरिका स्पेस कंट्रोल शस्त्रे

आता अवकाशातही होणार युद्ध? अमेरिकेकडून अवकाशात ‘स्पेस कंट्रोल’ शस्त्रे तैनात

America Space Weapon: इस्रायल-पॅलेस्टाईन आणि रशिया-युक्रेन संघर्षासह पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आता अवकाशातही लष्करी स्पर्धा तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेने अवकाशात शस्त्रे

आता अवकाशातही होणार युद्ध? अमेरिकेकडून अवकाशात ‘स्पेस कंट्रोल’ शस्त्रे तैनात

America Space Weapon)

वाशिंग्टन (America Space Weapon) : इस्रायल-पॅलेस्टाईन आणि रशिया-युक्रेन संघर्षासह पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आता अवकाशातही लष्करी स्पर्धा तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेने अवकाशात शस्त्रे तैनात केल्याची माहिती (US Space Force) ‘यूएस स्पेस फोर्स’ने जाहीर केली. पृथ्वीच्या कक्षेत शस्त्रे तैनात करण्याची क्षमता असल्याचे अमेरिकेने प्रथमच अधिकृतरीत्या मान्य केले आहे.

‘यूएस स्पेस फोर्स’च्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेकडे कक्षेत ‘स्पेस कंट्रोल’ करणारी शस्त्रे आहेत. या (America Space Weapon) शस्त्रांच्या माध्यमातून शत्रूच्या कारवायांपासून संयुक्त दलांचे संरक्षण करता येते. मात्र, अवकाशात नेमकी कोणती शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत, याबाबत प्रवक्त्याने कोणतीही माहिती दिली नाही.

‘स्पेस कंट्रोल’ मोहिमेचा नेमका अर्थ काय?

‘यूएस स्पेस फोर्स’च्या मते, ‘स्पेस कंट्रोल’ (US Space Force) मोहिमा म्हणजे अवकाश क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाणे आणि तेथे आवश्यक लष्करी वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या मोहिमा. यामध्ये ‘कायनेटिक’ म्हणजे भौतिक आघात करणाऱ्या तसेच ‘नॉन-कायनेटिक’ म्हणजे भौतिक आघात न करणाऱ्या तंत्रांचा वापर केला जातो. या क्षमतांच्या माध्यमातून शत्रूच्या अवकाशविषयक साधनसामग्री आणि कारवायांवर परिणाम घडवून आणण्याची क्षमता विकसित केली जाते. त्यांचा वापर संरक्षणात्मक तसेच आक्रमक अशा दोन्ही उद्देशांसाठी केला जाऊ शकतो.

अवकाशाच्या लष्करीकरणाची जुनी पार्श्वभूमी

अवकाशातील लष्करी स्पर्धा (America Space Weapon) आणि त्याचे वाढते लष्करीकरण ही काही नवीन बाब नाही. 1957 मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघाने ‘स्पुटनिक’ हा पहिला कृत्रिम उपग्रह कक्षेत सोडल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात अवकाशातील वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. त्याच काळात उपग्रहांचा वापर तसेच शत्रूचे उपग्रह निष्क्रिय किंवा नष्ट करण्याच्या तंत्रज्ञानाच्या विकासावरही काम सुरू झाले.

अवकाशात अण्वस्त्रे तैनात (America Space Weapon) करण्याची शक्यता एकेकाळी मोठी चिंता ठरली होती. या पार्श्वभूमीवर 1967 मध्ये अनेक देशांनी (Outer Space Treaty) ‘आउटर स्पेस ट्रीटी’वर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार पृथ्वीच्या कक्षेत मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणणारी शस्त्रे तैनात करण्यास बंदी घालण्यात आली.

मात्र, उपग्रहविरोधी शस्त्रे, इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमता आणि इतर अवकाशविषयक लष्करी तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अवकाशाचे लष्करीकरण आजही सुरूच आहे. (America Space Weapon) अमेरिकेने कक्षेत ‘स्पेस कंट्रोल’ (US Space Force) शस्त्रे असल्याचे केलेले हे अधिकृत वक्तव्य त्यामुळे भविष्यातील अवकाशातील लष्करी स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.