श्री मुक्ताई पालखी सोहळा

​बेराळा येथे २५० वर्षांची परंपरा उत्साहात; श्री मुक्ताई पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Shri Muktai Palkhi : मुक्ताईनगर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणारी आणि पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला लागलेली संत आदिशक्ती श्री मुक्ताई यांची पालखी दिंडी चिखली तालुक्यातील बेराळा येथे दाखल

​बेराळा येथे २५० वर्षांची परंपरा उत्साहात; श्री मुक्ताई पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Shri Muktai Palkhi

११ क्विंटल महाप्रसादाचे वाटप

​चिखली (Shri Muktai Palkhi) : मुक्ताईनगर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणारी आणि पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला लागलेली संत आदिशक्ती श्री मुक्ताई यांची पालखी दिंडी चिखली तालुक्यातील बेराळा येथे दाखल झाली असता, श्री मुक्ताई संस्थान बेराळा व समस्त गावकऱ्यांच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. बेराळा वासियांची तब्बल २५० वर्षांची ही थोर परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावाने आणि एकजुटीने जपली जात आहे.

​दिनांक ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान बेराळा येथे 'अखंड हरिनाम व श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहा'चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दररोज काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम, श्री ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली. यामध्ये श्री.ह.भ.प. कैलास महाराज आडे, सौ.ह.भ.प. सविताताई केकण, श्री.ह.भ.प. पवन महाराज कदम, श्री.ह.भ.प. सागर महाराज भोडे, श्री.ह.भ.प. अक्षय महाराज तायडे, श्री.ह.भ.प. नामदेव महाराज नरोटे, आणि श्री.ह.भ.प. विजय महाराज कव्हळे या कीर्तनकारांची प्रबोधनात्मक कीर्तने झाली.

​२५० वर्षांची अन्नदानाची परंपरा व महाप्रसाद
​बेराळा गावाची २५० वर्षांची परंपरा आहे की, मुक्ताईनगरवरून पंढरपूरकडे दिंडी जाताना तसेच पंढरपूरवरून परतीच्या प्रवासात दिंडीचा मुक्काम बेराळा येथे असतो. या दोन्ही प्रसंगी श्री मुक्ताई संस्थान व समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिंडीतील सहभागी हजारो वारकऱ्यांसाठी जवळपास ११ क्विंटल महाप्रसादाचे अन्नदान केले जाते. आज, बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी परतीच्या मुक्कामाप्रसंगी तब्बल ११ क्विंटल अन्नधान्याचा महाप्रसाद अत्यंत श्रद्धेने वितरित करण्यात आला.

​पालखी मिरवणूक व काल्याचे कीर्तन
​आज सप्ताहाच्या सांगता दिनी (१२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता गावातून श्री मुक्ताईंच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'मुक्ताई माऊली'च्या गजराने संपूर्ण बेराळा नगरी दुमदुमून गेली होती. सकाळी ११ ते १ या वेळेत श्री मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगरचे व्यवस्थापक श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर दुपारी २ वाजेपासून माऊलींच्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

​या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख श्री.ह.भ.प. सुधाकर महाराज, सप्ताह नेतृत्व करणारे समस्त गावकरी मंडळी, हरिपाठ नेतृत्व, मृदंगाचार्य, गायनाचार्य, काकडा व भजनी मंडळ (आदिशक्ती मुक्ताई महिला भजनी मंडळ), अध्यक्ष व पंचकमेटी श्री मुक्ताई संस्थान बेराळा तसेच परिसरातील सर्व भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेऊन बेराळा वासियांच्या या अथांग भक्ती आणि अन्नदानाच्या परंपरेचे कौतुक केले.

संबंधित सामग्री

संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त १५०० भाविकांचे सामूहिक ग्रंथ पारायण

संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त १५०० भाविकांचे सामूहिक ग्रंथ पारायण

Saint Gajanan Maharaj Palkhi: शेगावचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे ३० जून रोजी रिसोड नगरीत आगमन होत आहे. या मंगलमयी पर्वाचे औचित्य साधून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारा

Jun 29, 2026