भारत घाऊक महागाई

घाऊक महागाईचा भडका! अन्नपदार्थ, उत्पादित वस्तू, इंधन-विजेच्या वाढत्या किमतींमुळे महागाई

India's wholesale inflation: देशातील घाऊक महागाईचा वाढता आलेख ऑगस्ट महिन्यातही कायम राहिला आहे. अन्नपदार्थ, उत्पादित वस्तू, इंधन आणि विजेच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाईचा दर 9.92 टक्क्यांवर

घाऊक महागाईचा भडका! अन्नपदार्थ, उत्पादित वस्तू, इंधन-विजेच्या वाढत्या किमतींमुळे महागाई

wholesale inflation

 

सर्वसामान्यांसह उद्योगांचे बजेट कोलमडले...

नवी दिल्ली (India's wholesale inflation) : देशातील घाऊक महागाईचा वाढता आलेख ऑगस्ट महिन्यातही कायम राहिला आहे. अन्नपदार्थ, उत्पादित वस्तू, इंधन आणि विजेच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाईचा दर 9.92 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांच्या खर्चाचा ताण वाढला असून दुसरीकडे उद्योगांच्या उत्पादन खर्चावरही मोठा दबाव निर्माण झाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, (wholesale inflation) घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI) आधारित महागाईचा दर जुलै महिन्यातील 9.78 टक्क्यांवरून वाढून ऑगस्ट 2026 मध्ये 9.92 टक्क्यांवर पोहोचला. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून घाऊक महागाईत सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अन्नधान्य आणि इंधनाच्या किमतींचा मोठा फटका

घाऊक महागाई वाढण्यामागे अन्नधान्य तसेच इंधन आणि वीज क्षेत्रातील वाढलेल्या किमतींची प्रमुख भूमिका आहे.

अन्न निर्देशांक : दैनंदिन वापरातील अन्नपदार्थांच्या किमती वाढल्याने अन्न क्षेत्रातील महागाईचा दर जुलैतील 6.65 टक्क्यांवरून वाढून ऑगस्टमध्ये 7.05 टक्क्यांवर पोहोचला.

उत्पादन क्षेत्र : उत्पादित वस्तूंच्या घाऊक महागाईचा दरही जुलैतील 8.29 टक्क्यांवरून वाढून 8.37 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे (wholesale inflation) उत्पादन खर्चातील वाढीचा दबाव कायम असल्याचे दिसून येते.

इंधन आणि वीज : या क्षेत्रातील महागाईने सर्वाधिक चिंता वाढवली आहे. ऑगस्टमध्ये इंधन आणि वीज क्षेत्रातील (wholesale inflation) घाऊक महागाईचा दर तब्बल 22.93 टक्के नोंदवला गेला. जुलैमध्ये हा दर 20.05 टक्के होता.

पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ

इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई वाढण्यामागे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीतील वाढ महत्त्वाची ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत 38.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर कच्चे पेट्रोलियम आणि (wholesale inflation) नैसर्गिक वायूच्या किमती 34.41 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पेट्रोलियमशी संबंधित वस्तूंच्या किमतीत झालेल्या या मोठ्या वाढीचा थेट परिणाम वाहतूक, उत्पादन आणि ऊर्जा खर्चावर होत असल्याने उद्योगांसमोरील खर्चाचे आव्हान आणखी वाढले आहे.

प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवरही महागाईचा दबाव

अन्न क्षेत्रातही महागाईचा दबाव वाढला आहे. ऑगस्टमध्ये (wholesale inflation) अन्न निर्देशांकातील महागाई 7.05 टक्के, तर जुलैमध्ये ती 6.65 टक्के होती. याशिवाय तयार अन्न उत्पादनांच्या किमतीतही 9.65 टक्क्यांची महागाई नोंदवली गेली. याचा परिणाम केवळ कच्च्या अन्नपदार्थांपुरता मर्यादित नसून पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होत आहे. त्यामुळे घरगुती खर्चासोबतच उद्योगांच्या उत्पादन आणि वितरण खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.