हिंगोली श्री महालक्ष्मी आरास

हिंगोलीत पांडे परिवाराची आकर्षक श्री महालक्ष्मी आरास; तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

Hingoli Shri Mahalakshmi Decoration: पांडे परिवाराने यंदाच्या श्री महालक्ष्मी उत्सवानिमित्त साकारलेली आकर्षक आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाच्या उत्सवासाठी तिरुपती येथील तिरुमला श्री वेंकटेश्वर

हिंगोलीत पांडे परिवाराची आकर्षक श्री महालक्ष्मी आरास; तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

Hingoli Shri Mahalakshmi Decoration

हिंगोली (Hingoli Shri Mahalakshmi Decoration) : शहरातील नाईकनगर येथील पांडे परिवाराने यंदाच्या श्री महालक्ष्मी उत्सवानिमित्त साकारलेली आकर्षक आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाच्या उत्सवासाठी तिरुपती येथील तिरुमला श्री वेंकटेश्वर बालाजी मंदिराच्या भव्य स्थापत्यकलेपासून प्रेरणा घेऊन श्री महालक्ष्मी मातेची मनमोहक आरास तयार करण्यात आली आहे. यामध्ये द्रविडीयन वास्तुशैली, भव्य गोपुरम, सुवर्णमय कलाकुसर, मंदिराचे नक्षीकाम आणि दीपमाळांची पारंपरिक रचना यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. भव्य मंदिररचना, सुवर्ण कलाकुसर आणि भक्तीमय वातावरणामुळे ही आरास भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

ही संपूर्ण सजावट नाईकनगर, हिंगोली येथील पांडे परिवारातील महिलांनी केली असून यामध्ये प्रणिता पांडे, मीनल पांडे, पूजा पांडे, साक्षी पांडे आणि कुमारी रावी पांडे यांचा सहभाग आहे. पांडे परिवाराने साकारलेल्या या (Hingoli Shri Mahalakshmi Decoration) आगळ्यावेगळ्या आरासचे परिसरातील भाविकांकडून कौतुक होत आहे.