जागतिक ऊर्जा संकट

जागतिक ऊर्जा संकट; 'या' देशात पेट्रोल-डिझेल 17 टक्क्यांपर्यंत महाग!

Global Energy Crisis: मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होत असताना अनेक देशांमध्ये इंधनाच्या दरवाढीचा फटका बसू लागला आहे. वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि वाहतूक

जागतिक ऊर्जा संकट; 'या' देशात पेट्रोल-डिझेल 17 टक्क्यांपर्यंत महाग!

AI Generated Image

 

अमेरिकेत डिझेलच्या दराने गाठली विक्रमी पातळी

वॉशिंग्टन/ नवी दिल्ली (Global Energy Crisis) : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होत असताना अनेक देशांमध्ये इंधनाच्या दरवाढीचा फटका बसू लागला आहे. वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि वाहतूक खर्चाचा परिणाम म्हणून बांगलादेशने पेट्रोलियम पदार्थांच्या दरात तब्बल 17.4 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. दुसरीकडे, अमेरिकेत डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्याची माहिती आहे.

बांगलादेशात सोमवारपासून इंधनाचे नवे दर लागू करण्यात आले. त्यानुसार, डिझेलचा दर प्रतिलिटर 115 टाक्यांवरून 135 %, पेट्रोलचा दर 140 वरून 160 टाके, तर 95 ऑक्टेन पेट्रोलचा दर 145 वरून 165 टाके करण्यात आला आहे. रॉकेलच्या दरातही वाढ करण्यात आली असून तो 135 वरून 155 टाके प्रतिलिटर झाला आहे. बांगलादेशच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्चपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमतीत दुप्पटपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत इंधनाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारी तेल कंपनीला मोठा तोटा

इंधनाच्या दरवाढीमुळे बांगलादेशातील वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. देशातील सरकारी तेल कंपनीला मार्च ते ऑगस्ट या कालावधीत सुमारे 228.76 अब्ज टाक्यांचा तोटा झाला. हा आर्थिक भार कमी करण्यासोबतच परकीय चलनावरील दबाव कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेतही डिझेल महागले..

दरम्यान, अमेरिकेत डिझेलच्या सरासरी दरानेही उच्चांक गाठला आहे. डिझेलचा दर प्रतिगॅलन 6.45 डॉलरपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतूक, शेती तसेच पुरवठा साखळीवरील खर्च आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक पातळीवर तेलाच्या पुरवठ्यावर निर्माण झालेला दबाव आणि वाढत्या इंधन किमतींचा परिणाम आगामी काळात विविध देशांच्या महागाई आणि वाहतूक खर्चावर होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026