सचिन तेंडुलकर एआय

सचिन तेंडुलकरांची AI विश्वात एंट्री; OpenAI सोबत भागीदारी

Sachin Tendulkar AI: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआयसोबत भागीदारी जाहीर केली आहे. चॅटजीपीटीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या नव्या शक्यता

सचिन तेंडुलकरांची AI विश्वात एंट्री; OpenAI सोबत भागीदारी

Sachin Tendulkar AI

 

ChatGPTच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या नव्या शक्यता शोधणार

नवी मुंबई (Sachin Tendulkar AI) : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआयसोबत भागीदारी जाहीर केली आहे. चॅटजीपीटीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या नव्या शक्यता समजून घेणे आणि एआयचा दैनंदिन जीवनातील उपयोग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, हा या सहकार्याचा प्रमुख उद्देश आहे.

तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे या भागीदारीची घोषणा केली. चॅटजीपीटीचा वापर करताना आपली उत्सुकता वाढल्याचे त्यांनी सांगितले. प्रश्न विचारणे, नवीन कल्पना तपासणे आणि विविध कामे अधिक सोपी करण्यासाठी चॅटजीपीटीचा उपयोग होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुटुंबासोबतच्या अलीकडील प्रवासाचे नियोजन करण्यासाठीही आपण चॅटजीपीटीचा वापर केल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.

या भागीदारीअंतर्गत तेंडुलकर (Sachin Tendulkar) स्वतःच्या अनुभवातून चॅटजीपीटीच्या विविध उपयोगांची माहिती देणार आहेत. शिक्षण, नवीन गोष्टी शिकणे, कल्पना विकसित करणे तसेच दैनंदिन कामांमध्ये AI चा वापर कसा करता येऊ शकतो, याबाबत ते आपले अनुभव शेअर करणार आहेत. आपल्या आवडीच्या विषयांवर चॅटजीपीटीचा प्रयोग करून पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या सहकार्याची सुरुवात तेंडुलकर (Sachin Tendulkar) चॅटजीपीटीचा वापर करतानाचे अनुभव मांडणाऱ्या दृकश्राव्य मोहिमेने होणार आहे. या माध्यमातून भारतातील विविध वयोगटांमध्ये एआयचा दैनंदिन वापर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी चॅटजीपीटीसोबतच्या एका व्हिडिओमध्ये दहा प्रश्नांच्या खेळातून स्वतःची ओळख ओळखण्याचे आव्हान दिले. चॅटजीपीटीने विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे त्यांची ओळख अचूकपणे ओळखली. या भागीदारीतून कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून सामान्य वापरकर्त्यांसाठीही उपयुक्त ठरू शकते, हे दाखवण्यावर भर दिला जाणार आहे.

टैग्स: Sachin Tendulkar AI