AI प्रणाली मानवी नियंत्रण

AI विकासाचा अतिवेग धोकादायक?, मानवी नियंत्रण गमावण्याची भीती

AI systems human control: एआयच्या क्षमतेचा वेग मानवी नियंत्रणाच्या (Human Control) पलीकडे गेला, तर त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) विकासाचा वेग नियंत्रित करण्याची

AI विकासाचा अतिवेग धोकादायक?, मानवी नियंत्रण गमावण्याची भीती

AI systems human control

सॅन फ्रान्सिस्को (AI systems human control) : एआयच्या क्षमतेचा वेग मानवी नियंत्रणाच्या (Human Control) पलीकडे गेला, तर त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) विकासाचा वेग नियंत्रित करण्याची वेळ आली आहे, असा गंभीर इशारा ‘अँथ्रोपिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डारिओ अमोदेई यांनी दिला आहे. एआयमुळे मानवजातीला मोठे फायदे मिळू शकतात; मात्र त्याचवेळी नियंत्रण गमावणे, सायबरहल्ले, जैव-दहशतवाद आणि मोठ्या आर्थिक उलथापालथीचे धोकेही वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआय उद्योगाने (AI systems) विकासाचा वेग काही प्रमाणात कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका अमोदेई यांनी मांडली. त्याचवेळी, आपल्या कंपनीच्या सुरक्षा उपाययोजनांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यासाठी बाह्य निरीक्षकांना कर्मचार्‍यांप्रमाणेच थेट आणि कायमस्वरूपी प्रवेश देण्याची घोषणा ‘अँथ्रोपिक’ने केली आहे.

अमोदेई यांनी ‘एक्स’वरील (AI systems) पोस्टद्वारे एआयच्या विकासाचा वेग नियंत्रित करण्यासाठी तीन टप्प्यांची योजना मांडली. त्यातील पहिले पाऊल म्हणून बाह्य निरीक्षकांना कंपनीच्या एआय प्रणालींमध्ये कायमस्वरूपी प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निरीक्षकांना कंपनीच्या सुरक्षा उपाययोजनांचे पालन होत आहे की नाही, एआयशी संबंधित घटनांची नोंद योग्य पद्धतीने केली जात आहे का आणि एआय मॉडेल्स (AI models) मानवी मूल्यांशी सुसंगत आहेत का, याची पडताळणी करता येणार आहे.

एआयमुळे मानवी जीवनाचा (Human Control) दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारण्याची शक्यता असल्याचे अमोदेई यांनी नमूद केले. पुढील पाच ते दहा वर्षांत (AI models) एआयच्या मदतीने अनेक गंभीर आजारांवर उपचार विकसित होऊ शकतात. तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्यासोबतच लोकशाही आणि स्वातंत्र्यालाही नवी ऊर्जा मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मात्र, एआयच्या (AI systems) वाढत्या क्षमतेसोबत त्याचे गंभीर धोकेही आहेत. एआय प्रणालींवरील मानवी नियंत्रण (Human Control) गमावणे, सायबरहल्ल्यांसाठी त्याचा गैरवापर, जैव-दहशतवादाला मदत मिळण्याची शक्यता तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलथापालथ होण्याचा धोका यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.